Pages

Monday, August 8, 2011

श्रावण आला ग दारी...

आषाडीचा महिना म्हणून केली पंढरीची वारी,
पुढे येत-येता श्रावण आला ग दारी.....

    वर्षा, हर्षा , तना - मनाची,
  भक्तिमय ह्या वातावरणाची,
 फुलपाखरे उडती हि न्यारी,
श्रावण आला ग दारी...

इंद्रधनुच्या ह्या बेटावर,
सूर्याच्या ह्या क्षितिजावर,
उंच- उंच केली गगनाची स्वारी,
श्रावण आला ग दारी....

Monday, July 11, 2011

तुझी मैत्रि .....

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु उन्हाळ्यातही पावसाळा
तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं
एखादं जाळीदार पान....
जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं
तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातं
तुझ्या मैत्रिविना आयुष्य धुसर धुसर वाटेल...
तशी वाट सापडेल जगण्याची...
पण...हातात माझ्या हक्काच असं काही नसेल
मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...
म्हणुनच वाटतं...तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही
मैत्रिचा ठेवा हा असाच जपुन ठेव
तु हस अन दु:ख तुझी माझ्याआड लपवुन ठेव
उद्या जर नसलोच तुझ्यासोबत तरी माझे शब्द असतील
तू हसत रहा माझ्यासाठी..तुला बघुन माझे शब्दही हसतील
शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि ....................

Saturday, July 2, 2011

सप्तसूर..


 नात्याला फुटे बंध प्रेमाची,
ऋतू पाहुनी मेघ बरसे हर्षासी
 ह्या इंद्रधनुच्या पायी 
सप्तसूर झाला जणू काही..
      रेशमाच्या फुलोर्यात 
   जणू माझ्या हृदयात 
   वेतना जणू होत नाही
  सप्तसूर झाला जणू काही..

Wednesday, May 25, 2011

मैत्री

मैत्री
मैत्री असावी कशी????
जशी मऊ-मऊ उशी...
      जवळ घ्यावी कि मऊ वाटे,
   जे करतील दूर वाटेतले अघोर काटे..
मैत्री सारखे सुख साऱ्या जगात नाही,
मैत्री च्या पलीकडे काही सुचत नाही....
        कवीला वाटे मैत्री हा जीवाचा प्राण आहे,
         पण साऱ्यांना ह्या मैत्रीचा अभिमान आहे......

Wednesday, May 18, 2011

संगती....

फुलात मिळूनी फुलपाखरू रंगात रंगती,
जी मला वाटली जपणारी ती कोणती संगती,
                विशाल वृक्ष जाहला, त्याचा सूर मनाला भावला,
                        आयुष्याचे खेळच असे विरंगती ,
                 जी मला वाटली जपणारी ती कोणती संगती 
आकाश भरुनी जे आले ,
त्यात चांदणे विसावले,
जसे ढग-ढग नाचती ,
जी मला वाटली जपणारी ती कोणती संगती..
                             
      

तो हा किनारा ........

शांत बसलो होतो किनारी , 
अचानक मनात आली उभारी ,
मंद मंद गार होता वारा,
मनाला भावाला तो हा किनारा...
    सूर्य आपले किरण ज्यावर धरती ,
     चंद्र आपला चेहरा ज्यात पाहती,
     निसर्गाने दिलेला हा सुंदर तारा,
     मनाला भावला तो हा किनारा......